पोलिसांसमोरच धमकी देणार्या २ धर्मांधांना अटक
मुंबई : चेंबूर, वाशीनाका (पश्चिम) येथील इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात अनधिकृतरित्या नमाजपठण केले जाते. या नमाजासाठी मार्ग बंद ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या विरोधात बजरंग सेनेचे अध्यक्ष श्री. पितांबर जाधव आणि उपाध्यक्ष श्री. ब्रीजेश सिंह यांनी या विरोधात चिकाटीने लढा देऊन पोलिसांना नमाज बंद पडण्यास भाग पाडले.
या वेळी मतीन शेख आणि अबसर हुसेन अन्सारी यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्षच इस्लामच्या विरोधात येईल, त्याचे सर कलम करण्यात येईल, अशी धमकी दिली. यावर पोलिसांनी या दोघांना तात्काळ अटक करून पुढील कारवाई केली. (पोलिसांसमक्ष हिंदूंना ठार मारण्याची धमकी देणारे धर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हेच यावरून दिसून येते. शासनकर्त्यांकडून अल्पसंख्यांकांचे केले जाणारे लांगूलचालन आणि पोलिसांचा नाकर्तेपणाचाच हा परिणाम आहे. पोलिसांना जर खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची असेल, तर त्यांनी अशा अपकृत्यांवर वेळीच आवर घालावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. २० जुलै या दिवशी श्री. पितांबर जाधव यांनी जयहिंदनगर, वाशीनाका येथे मुख्य रस्त्यावर महाआरती म्हणण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, यासाठी आर्.सी.एफ्. पोलीस ठाण्यात पत्र दिले; मात्र महाआरतीला पोलीस संरक्षण देण्याऐवजी पोलिसांनी महाआरतीला अनुमती नाकारली.
२. यानंतर २९ जुलै या दिवशी मुख्य रस्त्यावर महाआरती करणारे श्री. जाधव आणि बजरंग सेनेचे उपाध्यक्ष श्री. ब्रीजेश सिंह यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.
३. यावर श्री. जाधव यांनी महाआरती बंद करायची असेल, तर प्रथम भररस्त्यात चालू असलेले नमाजपठण बंद करण्याची मागणी केली आणि तसे पत्रही ३१ जुलै या दिवशी पोलीस ठाण्यात दिले.
४. श्री. जाधव यांनी दिलेल्या पत्रावरून पोलिसांनी मुसलमानांना पोलीस ठाण्यात बोलावून रस्त्यावर केले जाणारे नमाजपठण बंद करण्याचा आदेश दिला.
५. या प्रकरणी प्रारंभी पोलिसांकडून येणारा दबाव, मुसलमानांकडून आलेल्या धमक्या यांना न घाबरता श्री. पितांबर जाधव, श्री. ब्रीजेश सिंह आणि बजरंग सेनेचे कार्यकर्ते यांनी कायदेशीर मार्गाने लढा दिला अन् पोलिसांना रस्त्यावरील नमाज बंद पाडण्यास भाग पाडले. (हिंदूंवर कारवाई करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस मुसलमानांपुढे मात्र नांगी टाकतात, हाच भारतातील सर्वधर्मसमभाव आणि पुरोगामित्व आहे का ? अल्पसंख्य असूनही संघटित असल्यामुळे मुसलमानांचा वचक आहे, तर बहुसंख्य असूनही संघटित नसल्याने स्वतःच्याच देशात हिंदूंना मूल्य नाही. हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच हिंदूंसाठी हितावह आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. मुंबईतील भेंडीबाजार येथे पोलीस मुख्यालयाच्या जवळच प्रत्येक शुक्रवारी रस्ता बंद करून अनधिकृतपणे नमाज पठण करण्यात येते. यासह शहरात मेट्रो टाकी येथे रस्ता बंद करून नमाज पठण करण्यात येते. या विरोधात पोलीस स्वतःहून कारवाई करणार का ? कि तक्रारीची वाट पहाणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
वरिष्ठांच्या सांगण्यावरून धर्माभिमानी हिंदूंना अटक करणारे पोलीस उपायुक्त शहाजी उमप
यानंतर पुढील शनिवारी म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशीही महाआरती करणारे श्री. पितांबर जाधव आणि श्री. ब्रीजेश सिंह यांना पोलिसांनी अटक केली. या वेळी पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी श्री. जाधव यांना महाआरती बंद करण्यासाठी आम्हाला वरिष्ठ पातळीवरून विचारण्यात येत असल्याचे सांगितले. (महाआरती बंद होण्यासाठी वरीष्ठ पातळीवरून विचारणा होते, तर अनधिकृत भोंगे आणि नमाज बंद होण्यासाठी का विचारणा होत नाही ? यावरून पोलिसांची मुसलमानांंविषयीची बोटचेपी भूमिका आणि हिंदूंवर उद्दामपणे करण्यात येणारा अन्याय दिसून येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात