Menu Close

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

  • भारतातील बांगलादेशी मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे, असे भारतातील एकतरी शासनकर्ता कधी म्हणतो का ?
  • बांगलादेश एक मुसलमानबहुल देश असतांनाही तो रोहिंग्या मुसलमानांना तेथे कायमस्वरूपी आश्रय देण्यास नकार देत आहे. जगातील ५७ इस्लामी राष्ट्रेही रोहिंग्यांना साहाय्य करत नाहीत; मात्र भारतातील धर्मांध हे रोहिंग्यांना आश्रय देण्यासाठी मोर्चे काढत आहेत. अशा धर्मांधांनाही रोहिंग्यांसह भारतातून हाकलून द्यावे, अशी कोणीही मागणी करील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

ढाका : रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले. बांगलादेशात थांबणे हा रोहिंग्यांपुढचा पर्याय असू शकत नाही. रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे, असेही हक यांनी म्हटले आहे.

हक पुढे म्हणाले की,

१. म्यानमारमध्ये हिंसाचार झाल्यावर रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला, तरी म्यानमारने या सगळ्यांना परत बोलावले पाहिजे. यासाठी आम्ही म्यानमारला एक लेखी प्रस्तावही दिला आहे. प्रथम म्यानमारने रोहिंग्यांना परत बोलवण्यात पुढाकार घेतला; मात्र आता त्याच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. म्यानमारने रोहिंग्यांना असे वार्‍यावर सोडू नये.

२. म्यानमारमधून ५ लाखांपेक्षा अधिक रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात आले. या सगळ्यांना म्यानमारने परत बोलावलेच पाहिजे. रोहिंग्या आश्रितांमध्ये बहुतांश लोक मुसलमान आहेत. काही लोक हिंदु आणि ख्रिस्तीही आहेत. या सगळ्यांचे दायित्व आम्ही कसे काय घेणार?

३. म्यानमारचे परराष्ट्रमंत्री ए.एच्. महमूद अली यांनी रोहिंग्या शरणार्थींना परत बोलवण्याच्या सूत्रावर सहमती दर्शवली होती; मग आता त्यांना आश्‍वासनाचा विसर पडला का ?

४. रोहिंग्यांविषयी म्यानमारच्या प्रमुख आंग सान सू की यांनी मौन का बाळगले आहे, असा प्रश्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. लोकशाहीसाठी संघर्ष करणार्‍या सू की यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी त्या पात्र होत्या, असे त्यांच्या वागण्यावरून वाटत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *