Menu Close

रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील डिचोली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ५०० हिंदूंची उपस्थिती

रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करण्याची मागणी

समस्त हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली राष्ट्रीय स्तरावरील हिंदुहिताच्या विषयांवर डिचोली येथे निदर्शने करतांना

डिचोली : भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, म्यानमारमधील विस्थापित हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करून जातीय तणाव निर्माण करणार्‍या भारतातील धर्मांध मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करावे, या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता. गोव्यात रोहिंग्यांना समर्थन देणारी फेरी प्रथम डिचोली येथून काढण्यात आली होती आणि यानंतर वास्को अन् मडगाव येथे अशाच स्वरूपाच्या फेर्‍या झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करण्याची मागणी करण्यासाठीच्या या आंदोलनाला येथील हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. आंदोलनात १४ हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या, तर एकूण ५०० हिंदू उपस्थित होते. आंदोलनाला एका जाहीर सभेचे स्वरूप आले होते.

आंदोलनाला शंखनादाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले. निदर्शनात श्री. जयेश थळी यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. राहुल वझे यांनी केले.

रोहिंग्यांची जात विंचवासारखी असल्याने त्यांना वेळीच हाकलून लावा ! – ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे

रोहिंग्यांना भारतात कोणी आणले याचा शोध घ्या. रोहिंग्यांची जात विंचवासारखी असून त्यांचे कितीही भले केले, तरी ते डंख मारल्याशिवाय रहाणार नाहीत. रोहिंग्याना वेळीच हाकलून दिले पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. राज्यकर्ते त्यांच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यात व्यस्त असतात.

आंदोलनाद्वारे हिंदूंच्या शासनाकडे मागण्या

१. म्यानमारमधील हिंसाचारामुळे निर्वासित तेथील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारत शासनाने या संदर्भात त्वरित भूमिका घोषित करावी.

२. म्यानमार आणि तेथून बांगलादेश येथे विस्थापित झालेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. भारत सरकारने म्यानमारमधील हिंदूंच्या सुरक्षिततेचे गंभीर सूत्र जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ते संयुक्त राष्ट्र संघामध्ये उपस्थित करावे.

३. हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या, हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना नमाज पढण्यासाठी सक्ती करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये.

४. जम्मूमध्ये उभारण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या वसाहतींवर कारवाई करावी.

५. ज्या ज्या संघटना, व्यक्ती अथवा धार्मिक नेते रोहिंग्यांची बाजू घेत आहेत, त्यांच्यावरही देशद्रोह्यांचे समर्थक म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी.

६. रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या, म्यानमारमध्ये हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांविषयी सहानुभूती दाखवणार्‍या भारतीय मुसलमानांना वा तथाकथित निधर्मीवाद्यांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये.

आंदोलनात सहभागी संघटना

जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई; पंतजली योग समिती आणि भारत स्वाभिमान; स्वराज्य संघटना म्हापसा आणि मडगाव, वीर सावरकर युवा मंच; हिंदवी स्वराज्य मडगाव; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शिव कृपानंद स्वामी संप्रदाय; मये ग्रामरक्षा दल; शिवसेना; सनातन संस्था; रणरागिणी; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ; हिंदु जनजागृती समिती

आंदोलनातील वक्ते

सर्वश्री विश्‍वराज सावंत, शिवप्रेमी संघटना; रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; किशोर राव, उत्तर गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; समीर गावस, हिंदु स्वराज्य संघटना; जयेश नाईक, हिंदवी स्वराज्य संघटना; भारत गुळण्णवर, भारत स्वाभिमान; उल्हास शेट्ये, छत्रपती शिवाजी महाराज संघटना, मुरगाव आणि सौ. सिद्धी प्रभु, आस्था बिगर शासकीय संस्था

रोहिंग्यांच्या समर्थनार्थ फेरीमध्ये सहभागी झाल्याची चूक मांडण्यास राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे व्यासपीठ मिळाले ! – भाजपचे आमदार राजेश पाटणेकर

मी रोहिंग्याच्या समर्थनार्थ डिचोली येथे झालेल्या फेरीत सहभागी झाल्यानंतर माझ्यावर सर्व बाजूंनी टिकेची झोड उठली. पक्षश्रेष्ठींकडून मला तंबीही मिळाली. यामुळे मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. ही चूक मांडण्यासाठी मला राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे व्यासपीठ मिळाले. मला रोहिंग्यांची पार्श्‍वभूमी नंतर लक्षात आली आणि केंद्राचे या संदर्भातील धोरणही स्पष्ट झाले.

क्षणचित्रे

१. आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे श्री. चंद्रशेखर देसाई उपस्थित होते.
२. एरव्ही या दिवसात प्रतिदिन सायंकाळी डिचोलीत पाऊस पडतो; मात्र आंदोलनाच्या वेळी पाऊस आला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *