एर्नाकुलम (केरळ) : एर्नाकुलम येथे आंध्र सांस्कृतिक संघटनेने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत यांनी या वेळी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व विषद केले. सुमारे ७५ जणांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यानाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बर्याच जणांनी शंकांचे निरसन करून घेतले. एकाने ते समितीच्या संकेतस्थळावरील बालसंस्काराविषयीचे सदर नियमितपणे बघतात आणि मुलांनाही दाखवतात, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. अनेकांनी सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ विकत घेतले.
२. रेकी पद्धतीचा उपचार करणार्या महिलेने सौ. सुमा पुथलत यांच्या भोवती वलय दिसत असल्याचे सांगितले. सौ. पुथलत यांचे व्याख्यान ऐकावेसे वाटत होते, असे त्या म्हणाल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
अरुंबक्कम (चेन्नई) येथे आदि पराशक्ती मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान
चेन्नई : अरुंबक्कम (चेन्नई) येथे आदि पराशक्ती अम्मा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. प्रभाकरन् आणि सौ. कल्पना बालाजी या वेळी उपस्थित होते. सौ. कल्पना बालाजी यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. सुमारे २० जणांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात