भारतात असे होणे शक्य नाही; कारण निधर्मीवाले मुसलमानांच्या कथित धर्मस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आव आणत त्याला विरोध करतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोपेनहेगन : डेन्मार्कच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड, बुल्गेरिया, जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी बुरख्यावर बंदी घातली आहे. (भारतात बुरख्याचा वापर करून देशविघातक कृत्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. असे असतांनाही भारत सरकार त्यावर बंदी घालत नाही, हे खेदजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) डेन्मार्कच्या लिबरल पक्षाचे प्रवक्ता जेकब एलमॅन जेनसन म्हणाले की, ही कोणत्याही धार्मिक वेशभूषेवरील बंदी नाही, तर पूर्ण अंग झाकण्यावर बंदी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात