Menu Close

हिंदु कुटुंबावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून महिलांना मारहाण !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून पोलीस ठाण्यात निवेदन

  • हिंदूंनो, जेथे ख्रिस्ती बहुसंख्य असतात, तेव्हा ते हिंदूंशी कसे वागतात हे जाणा आणि त्यांचे खरे स्वरूप ओळखा !
  • घरवापसीच्या नावाने गळे काढणारे देशभरातील मानवतावादी आणि तथाकथित साम्यवादी पत्रकार यांची अशा घटनांच्या संदर्भात अळीमिळी गुपचिळी असते. एकाही वाहिनीचे पत्रकार पीडित हिंदु कुटुंबाच्या घरी गेले नाहीत, हेही लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नायगाव (जिल्हा पालघर) : येथे रहाणार्‍या बारिया कुटुंबाला धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला आणि कुटुंबातील महिलांना मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी, तसेच या परिसरात ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतरासाठी बळजोरी करण्याच्या संदर्भातील वाढता उद्दामपणा यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर प्रतिपक्षाची बाजू ऐकून पुढील कारवाई करण्याविषयीचे आश्‍वासन पोलिसांनी दिले.

या वेळी जगदंब प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवरत्न प्रतिष्ठान, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती आणि मराठा प्रतिष्ठान इत्यादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करत पोलीस अधिकार्‍यांवर रोष व्यक्त केला आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यात शिवसेना उपशहर संघटक सौ. अर्चनाताई सरुडकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

१. नायगाव येथील बारिया कुटुंब हे मागील काही मासांपासून अत्यंत मानसिक दबावाखाली होते. ते रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

२. मात्र स्वाभिमानी बारिया कुटुंब हे दाद देत नाही, हे पाहून त्यांना सक्तीचे धर्मांतर करण्यासाठी विविध मार्गांनी त्रास देणे चालू केले.

३. कधी पाण्यासाठी अडवणूक करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे अशा प्रकारचे त्रास हे कुटुंब काही मास सहन करत होते.

४. नवरात्रीच्या वेळी या कुटुंबातील महिलांना मारहाण करण्यात आली. सामाजिक संकेतस्थळावरून हा प्रकार लक्षात आला.

५. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या पीडित कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार हिंदुत्वनिष्ठांना सांगितला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *