शत्रूराष्ट्र चीनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्र्राभिमान जागृत ठेवा !
मुंबई : शत्रूराष्ट्र्र चिनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्या दोषींवर कठोर कारवाई करून सिंहगड किल्ल्याचे बांधकाम प्रामाणिक आणि तज्ञ कंत्राटदाराकडून करण्यात यावे आदी मागण्यांसाठी अंधेरी (पू.) रेल्वे स्थानकाबाहेरील लेफ्टनंट सचिन मिरजकर चौक येथे ७ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, वीर सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना आणि भाजप यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच आंदोलन पाहत असतांना अनेक राष्ट्र्रप्रेमी नागरिक आणि हिंदु बांधव उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागीही झाले होते. आंदोलनाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी चळवळीला शेकडो नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
चिनचे सामान आम्ही घेणार नाही, अशी आपण शपथ घेऊया ! – शंकर तिवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
चिनने आतापर्यंत पाकला अनेक वेळा साहाय्य केले आहे. अशा चिनचे साहित्य विकत घेणे, म्हणजे शत्रूला साहाय्य करण्यासारखे आहे. शासनही जर चिनचे साहित्य घेण्याचे समर्थन करत असेल, तर आम्ही त्यास संपूर्ण शक्तीनिशी विरोध करण्यास सिद्ध आहोत. चिनचे सामान आम्ही घेणार नाही, अशी आपण शपथ घेऊया !
चीन निर्मित साहित्यावर बहिष्कार घालून भारतीय साहित्याला प्रोत्साहन द्या ! – फुलचंद उबाळे, जिल्हा सचिव, उत्तर-पश्चिम मुंबई, भाजप
आपण चिनी साहित्याच्या आकर्षणाला, अल्प मूल्याला भुलून ते साहित्य घेतले, तर तो पैसा शत्रूराष्ट्राला जाणार आहे. दीपावलीच्या कालावधीत चीन निर्मित आकाशकंदील, दिवे यांवर बहिष्कार घाला. म्यानमारमध्ये बौद्ध आणि हिंदू यांवर अत्याचार करणार्या रोहिंग्या मुसलमानांना आपल्या देशात आश्रय दिला, तर हे राक्षसी प्रवृत्तीचे रोहिंग्ये येथेही असेच थैमान घालणार. रोहिंग्या मुसलमानांना हाकलून लावणे, हे देशाच्या सुरक्षेसाठी हिताचे आहे.
रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थान देऊन येथे इस्लामी सत्ता स्थापन करण्याचा डाव ! – संदीप सिंग, हिंदुत्वनिष्ठ
आज आपल्या देशात म्यानमारच्या घुसखोरांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, लोकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे आपल्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. रोहिंग्या मुसलमानांना इतर मुसलमान देशांनी आश्रय देण्यास नकार दिला, मग आपल्या देशात त्यांना आश्रय का ? रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थान देऊन येथे इस्लामी सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा डाव आहे.
रोहिंग्या मुसलमानांसोबत या देशात अवैध वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांनाही हाकलून लावा ! – ब्रिजेश शुक्ल, बजरंग दल
जेव्हा काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना बाहेर काढण्यात आले, तेव्हा कोणीही आवाज उठवला नव्हता; मात्र आज रोहिंग्या मुसलमानांंसाठी मशिदी, मदरशांतून मुसलमान नेते, मौलवी फतवे काढत आहेत. रोहिंग्या मुसलमानांसोबत या देशात अवैध वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांनाही हाकलून लावले पाहिजे. आज आपण संपूर्ण स्वदेशीचा आग्रह धरला पाहिजे आणि चिनी मालावर बहिष्कार घातला पाहिजे.
सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर कठोर कारवाई करा ! – सागर चोपदार, हिंदु जनजागृती समिती
सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात कंत्राटदारांनी भ्रष्टाचार केला आहे. या संदर्भात शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. यात दोषी असलेले कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी यांना हेतूपुरस्सर पाठीशी घातले जात आहे. या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत. बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावी आणि त्यांना पदच्यूत करावे, तसेच सिंहगड किल्ल्याचे बांधकाम प्रामाणिक आणि तज्ञ कंत्राटदाराकडून करण्यात यावे, अशी आग्रही मागणी समस्त शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत.
क्षणचित्र
आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी आणि आंदोलन झाल्यावर अंधेरी येथे पाऊस होता; मात्र आंदोलनाच्या वेळी पाऊस पडला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात