सातारा : देवता-राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले, तसेच चिनी फटाके विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. सध्या बाजारात देवतांची तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे फटाक्यांवर सर्रास छापलेली आढळतात. हे फटाके फोडल्यामुळे या चित्रांच्या चिंधड्या उडून देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. तसेच बाजारात चिनी वस्तूंसमवेत चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. या संदर्भात प्रशासनाने अशी विक्री करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी या वेळी केली.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय खोले, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडीक, श्री. तुषार खोत, माजी नगरसेविका सौ. लीलावती निंबाळकर यांसह हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘उद्योग सहसंचालक (मुंप्रावि)’ यांच्या कार्यालयातून फटाक्यांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापू नयेत, असे पत्र उद्योजकांना पाठवून पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे.
२. ‘एक्सप्लोजिव्ह अॅक्ट, २००८’ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे, हा दंडनीय अपराध आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात