Menu Close

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

  • मुंबईतील धारावी आणि विक्रोळी येथे, तसेच नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

  • सिंहगड किल्ल्याच्या बांधकामातील भ्रष्ट कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

मुंबई : भारतात शिरलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी गुन्हेगारी करून थैमान घातले आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे. असे असतांना म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे. म्यानमारमधील बहुसंख्य असलेल्या बौद्धांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे शांतीप्रिय बौद्धांनी संघटित क्रांती करून रोहिंग्यांना देशातून हद्दपार केले. अशा आतंकवादी विचारसरणीच्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देणे म्हणजे भविष्यातील संकटाला निमंत्रण देण्याप्रमाणे आहे. त्यामुळे सरकारने या दबावतंत्राला बळी न पडता रोहिंग्यांना भारतातून त्वरित हाकलून लावावे यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने मुंबईतील धारावी आणि विक्रोळी तसेच नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते हस्तफलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

विक्रोेळी

विक्रोळी (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर ८ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आंदोलन करण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन घाग, श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले, शिवसेनेचे श्री. गणेश पाटील यांनी आंदोलनाला संबोधित केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून देणे का आवश्यक आहे, हे सांगितले.

सहभागी संघटना आणि पक्ष

श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच शिवसेना

सानपाडा

सानपाडा रेल्वे स्थानकाजवळील सेक्टर ५ मधील ‘बधाई स्वीट’जवळ ७ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आंदोलन करण्यात आले. समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी रोहिंग्या मुसलमानांना देशात वास्तव्य दिल्यास देशाची कशाप्रकारे हानी होऊ शकते, याविषयी अवगत केले, तसेच याविषयी सर्व स्तरांवर प्रबोधन करण्याचे नागरिकांना आवाहन केले. अकस्मात आलेल्या पावसातही आंदोलकांचा उत्साह टिकून होता. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. भालचंद्र गायकवाड यांनी केले. पुढील आंदोलन वाशी येथे घेण्याची मागणी वाशीतील हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी केली.

श्री. अस्मित कोंडाळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : गडकिल्ल्यांच्या डागडुजीत दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे शिवछत्रपतींचा कोणता आशीर्वाद जागवत आहेत ?

श्री. रमेश पावगे, शिवसाधना समूह : रोहिंग्या मुसलमानांंमुळे देशात कट्टरता वाढेल. धर्मांतर वाढून जिहादी प्रवृत्ती बोकाळेल. बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण होऊन सरकार आणि जनतेवर अतिरिक्त ताण येईल. त्यामुळे यांना शरणार्थी म्हणून भारतात थारा देऊ नका.

श्री. दीपक उंडे, हिंदु गर्जना संघटना : गडकिल्ल्यांंचे पैसे खाणारे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचे वंशज आजही जिवंत आहेत. अशा देशद्रोही मंडळींना देहांत शासन ही एकच शिक्षा योग्य आहे.

श्री. केदार चित्रे, हिंदु जनजागृती समिती : राजाने शरणार्थीचा धर्म, संस्कार, नितिमत्ता पाहून त्यास वास्तव्यास अनुमती द्यावी, असे आर्य चाणक्य यांनी सांगितले होते. आताच्या सरकारने याविषयीचा अभ्यास करावा.

श्री. मंगेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते : म्यानमारच्या पंतप्रधानाकडून भारतातील पंतप्रधानांनी कारवाई कशी करावी ते शिकावे आणि हे धोरण जम्मू काश्मीरमधील धर्मांध आतंकवादी आणि रोहिंग्या यांच्याविषयी अवलंबावे.

धारावी

येथील ९० फुटी मार्गावरील संकल्पना हौसिंग सोसायटीजवळील शिव मंदिराच्या जवळ ७ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आंदोलन करण्यात आले. या वेळी स्थानिक पोलिसांनी फेरीवाल्यांना हटवून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली. या वेळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. ओमकार कोलते यांनी केले.

श्री. दिनेश कोंडविलकर, वज्रदल : देशाचे तुकडे होण्यापासून जर भारत देशाला वाचवायचे असेल, तर रोहिंग्या मुसलमानांना देशात थारा देऊ नका !

श्री. प्रकाश सावंत, हिंदुराष्ट्र सेना : रोहिंग्या मुसलमानांना आश्रय देणे म्हणजे देशात दुसरा पाकिस्तान निर्माण करणे !

श्री. चंद्रकांत भदिर्केे, हिंदु जनजागृती समिती : हिंदवी स्वराज्याचे, त्यागाचे, निष्ठेचे आणि शौर्याचे प्रतिक असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांंच्या गडकिल्ल्यावरील भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही !

उपस्थित संघटना आणि पक्ष

वज्रदल, हिंदुराष्ट्र सेना, श्री. शिवकार्य प्रतिष्ठान, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच भाजप

क्षणचित्रे

१. आंदोलनाच्या परिसरात मुसलमान लोकवस्तीतील लोक आंदोलनाचा विषय थांबून ऐकत होते.

२. रस्त्याने जाणार्‍या अनेकांनी भ्रमणभाष संचामध्ये आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण केले.

३. आंदोलन चालू असतांनाच पावसाचे आगमन झाले. तरीही आंदोलन पहाण्यासाठी जमलेला समूदाय तेथून हालला नाही.

४. थोड्या वेळासाठी सर्वत्र अंधार झाला; मात्र लगेचच आकाशाचा रंग पालटून पिवळा झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *