मुंबई : ‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवे तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल.’ अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाकेबंदीबाबत दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. फटाकेबंदीच्या निर्णयानंतर अनेक स्तरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले.
आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही. त्यामुळे फटाकेबंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.
संदर्भ : एबीपी माझा