अकोला : फटाक्यांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरूष यांची चित्रे छापली जातात. असे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्र्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन पायाखाली, केरात, चिखलात पडलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत, तसेच राष्ट्रीय अस्मितेवर आघात होत आहेत. यासाठी अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री शासनाने थांबवावी, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अजय खोत, सौ. माधुरी मोरे, कु. निधी बैस तसेच अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे या उपस्थित होत्या.
भारतात मोठ्या प्रमाणावर चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री होत आहे. त्याच्या निर्मितीसाठी ‘पोटॅशियम क्लोराइड’ आणि ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे विषारी रासायनिक मिश्रण वापरले जाते. या या रासायनिक पदार्थांच्या वापरावर भारतात बंदी आहे. यामुळे चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. भारत सरकारने चिनी फटाक्यांवरही बंदी घालावी, असे निवेदनात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात