Menu Close

पुण्यातील ‘सनबर्न’साठी पर्यटन विकास महामंडळाकडूनच प्रयत्न

संस्कृतीद्रोही सनबर्न फेस्टिव्हल होण्यासाठी साहाय्य करणारे पर्यटन विकास महामंडळ संस्कृतीचे रक्षण कसे करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेच वर्ष २०१७ चा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पुणे येथे होण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. याविषयी एक पत्र महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय वाघमारे यांनी ४ सप्टेंबर २०१७ या दिवशी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पाठवले होते. या पत्रात त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील ‘पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अ‍ॅण्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला आयोजनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.

या पत्रामध्ये सनबर्नला पर्यटन महामंडळाचे विना-आर्थिक सहकार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (पर्यटन वाढवण्यासाठी जनतेला मद्यपी बनवू पहाणार्‍या पर्यटन विकास महामंडळालाच हिंदु संस्कृतीचे धडे देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Tags : Sunburn

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *