भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : सनबर्न फेस्टिव्हलच्या (SUNBURN Festival) फेसबूक खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विकृत विडंबन झाल्याचे आढळून आले आहे. २ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही ध्वनीचित्रफीत १४९ जणांनी ‘शेअर’ केली आहे. (अशा प्रकारे राष्ट्रध्वजाला विकृत स्वरूपात दाखवून त्याची विटंबना करणे हा राष्ट्राशी केलेला द्रोहच आहे. यावरून सनबर्नच्या आयोजकांना भारताविषयी काय भावना आहे, हेच दिसून येते. भारतीय संस्कृतीसह राष्ट्रीय प्रतिकांचाही अनादर करणार्यांसाठी पायघड्या अंथरण्याची भूमिका सरकार अजूनही कायम ठेवणार कि अशा लोकांवर कठोर कारवाई करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी संताप व्यक्त करत सनबर्नचा निषेध केला आहे, तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे.
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले म्हणाले की, सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अनेक विदेशी कलाकार सहभागी होतात. यापूर्वीही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तिरंग्याचा अयोग्य पद्धतीने वापर करून आचारसंहितेचा भंग करण्यात आला होता. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेप्रमाणे पालन न करता स्वतःच्या लाभासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करून तिरंग्याला विकृत स्वरूपात प्रदर्शित करणे हा दंडनीय गुन्हा आहे. या संदर्भात पोलिसांकडे रीतसर तक्रार केली जाईल. पोलिसांनी राष्ट्रध्वजाची विटंबना करणार्यांवर त्वरित कारवाई करावी, तसेच शासनानेही सनबर्न फेस्टिव्हलच्या संदर्भात भूमिका जाहीर करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात