हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सज्जाद मुघल याचा पोलिसांपुढे धक्कादायक खुलासा !
तथाकथित भगव्या आतंकवादाविषयी ओरड करणारे आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : मुंबई येथे येऊन डोसा याला भेटावे, अशी माझी इच्छा होती. मुस्तफा डोसा माझा आदर्श होता, असा धक्कादायक खुलासा अधिवक्त्या पल्लवी पुरकायस्थ यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला सज्जाद अहमद मुघल याने गुन्हे शाखेच्या विशेष अन्वेषण पथकापुढे केला. जन्मठेपेची शिक्षा झालेला सज्जाद याची २८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाली होती. त्यानंतर सज्जाद याने पलायन केले होते. नुकतेच मुंबई पोलिसांनी त्याला जम्मू-काश्मीर येथून पुन्हा कह्यात घेतले. (यावरून पॅरोलवर सुटका करण्याचे निकष अयोग्य आहेत, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी अन्वेषणात सज्जाद याने वरील माहिती दिली.
आर्थररोड कारागृहात आणि सुनावणीच्या वेळी न्यायालयात सज्जाद याची डोसा याच्याशी ओळख झाली होती. मुंबईत येऊन डोसाची भेट घेण्याच्या विचारात तो होता; मात्र त्याआधीच डोसाचा मृत्यू झाल्याने सज्जाद याने हा विचार डोक्यातून काढून टाकला. पॅरोलवर सुटका होण्यापूर्वी सज्जाद याने कारागृहातील बंदीवान मित्राला ‘परत येणार नाही’, असे सांगितले असल्याचे अन्वेषणात उघड झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments