बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !
काँग्रेसच्या काळात पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांविषयी कोणालाही काही वाटत नव्हते. भाजप सत्तेवर असतांना हे चित्र पालटावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील रुहिया आखणगड क्षेत्रात एका हिंदु अल्पवयीन शाळकरी मुलीवर ५ धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. पीडित मुलीच्या पालकांनी आरोपींच्या विरोधात रुहिया पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, असे वृत्त दैनिक ‘बांगलादेश प्रोटिडिन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, २९ सप्टेंबरला रात्री ८ च्या सुमारास पीडित मुलगी तिच्या भावासह दुर्गापूजा उत्सवातून घरी परतत असतांना त्यांना ५ धर्मांधांनी अडवले आणि मुलीला उचलून केरानी पारा क्षेत्रात नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीच्या भावाने आरडाओरड केली; मात्र त्यांच्या साहाय्यासाठी कोणीच आले नाही. धर्मांधांच्या पाशवी लैंगिक अत्याचारामुळे मुलगी बेशुद्ध पडली. तिला बेशुद्धावस्थेत फेकून देऊन धर्मांधांनी तेथून पळ काढला. मुलीच्या पालकांना या घटनेविषयी कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपींच्या विरोधात रुहिया पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महंमद मंजुरुल इस्लाम (२३ वर्षे) याला अटक केली आहे, तर इतर ४ जण फरार आहेत.
‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी संघटनेचे प्रतिनिधी अश्वनी कुमार यांच्या साहाय्याने पीडित मुलीवरील सामूहिक बलात्काराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी रुहिया पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधून तातडीने तपास करण्याची मागणी केली. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात