कुरापतखोर पाकला अशी चेतावणी देण्याचे धाडस भारत कधी दाखवील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
प्योंगयांग (उत्तर कोरिया) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची ठिणगी उडवली आहे. त्यांनी त्यांच्यातील चिथावणीखोर वृत्ती प्रकट केली आहे. यावर आता चर्चेतून नव्हे, तर केवळ युद्धातूनच तोडगा निघू शकतो. आमच्या देशाचे सैन्य युद्धखोर अमेरिकेला आता शिक्षा करील, अशी गर्भित चेतावणी उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग यांनी अमेरिकेला दिली.
री योंग पुढे म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्रांना स्वत:ची प्रतिमा चांगली ठेवायची असेल, तर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. संयुक्त राष्ट्र आम्हाला नाहक त्रास देत आहे. आमच्या देशात असलेली अण्वस्त्रे न्याय्य आहेत. अमेरिकेपासून स्वत:चे रक्षण करण्याइतकी अण्वस्त्रसज्जता आमच्याकडे आहे.’’
अमेरिकेच्या वायुदलाने जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या साहाय्याने ६ ऑक्टोबरला रात्री उशिरा उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया चांगलाच भडकला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments