वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
वर्धा : म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पद्माकर नानोटी आणि योग वेदान्त समितीचे श्री. गुप्ता उपस्थित होते. धरणे आंदोलन झाल्यावर अपर जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. त्यांनीही निवेदन त्वरित पुढे पाठवण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
आतंकवादी रोहिंग्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वणी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन
वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौकात ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलावेे, सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शासन करावेे आणि वारंवार हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्या आणि सामाजिक शांतता भंग करणार्या प्रा. के.एस्. भगवान यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात आतंकवादी रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करणार्यांवर, देशद्रोही कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी व्यक्त केले. या आंदोलनात सौ. अरुणा ठाकरे, सौ. कल्पना खामणकर यांनीही विषय मांडले.
सिंहगडावरील बांधकामातील भ्रष्टाचार हा सामूहिक भ्रष्टाचाराचा प्रकार असून यात कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी आणि इतर अनेकांचा सहभाग सकृतदर्शनी दिसत आहे. ज्या हत्ती टाकीतून २४० ट्रक इतका गाळ काढल्याचे दाखवले आहे, प्रत्यक्षात त्या टाकीची तेवढी क्षमताच नाही.
या आंदोलनात २३ कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वश्री संजय पांडे, अमित काळे, लोभेश्वर टोंगे आणि सुरेश ठाकरे यांनी प्रयत्न केले.
क्षणचित्र :
आंदोलनाच्या उत्तरार्धात जोराचा पाऊस येण्याची स्थिती निर्माण झाली; मात्र पाऊस आला नाही, ही श्रीकृष्णाची कृपा या वेळी सर्वांना अनुभवता आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात