Menu Close

इंदूर (तेलंगण) आणि आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

अमरनाथ यात्रेचा अल्प केलेला कालावधी वाढवा !

इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करा !

RHA_-Indur
इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू

इंदूर (तेलंगण) : अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी वाढवण्यात यावा, तसेच इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसाठीयेथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे १४ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये श्रीराम युवा सेना, शिवसेना, भारत स्वाभिमान ट्रस्ट, हिंदु जनजागृती समिती, हनुमान परिनिरीक्षण समिती आदी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी श्रीराम युवा सेनेचे श्री. संजीव पुरोहित म्हणाले, हिंदूंवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात मोदी शासनाकडून अपेक्षा न करता आपल्यालाच लढा द्यावा लागणार आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष श्रीहरी गौड म्हणाले, काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे पक्ष आतंकवाद्यांना पाठिंबा देऊन हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन म्हणाले, केंद्रात हिंदुत्ववादी पक्षाचे शासन असतांनाही अमरनाथ यात्रेचा कालावधी अल्प करण्यात येऊन हिंदूंशी खेळ करण्यात येत आहे. इसिसशी संबंधित असणार्‍या १०० लोकांना पकडून त्यांचे समोपदेशन करून सोडून देण्यात येत आहे.

Agra_newsbw
आग्रा येथे राष्ट्रीय आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी

आग्रा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी येथील भगवान चित्रपटगृहाजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर येथील एसीएम् श्रीमती रेखा चौहान यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये सनातन संस्था, हिंदू सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

क्षणचित्र

आग्रा येथे चालू असलेल्या मॅराथॉन दौडीतील युवकांनी स्वत:हून पत्रके घेतली, स्वाक्षर्‍या केल्या आणि उत्स्फूर्त घोषणा दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *