Menu Close

अपहरण करून तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या धर्मांधास अटक

नागपूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने साथीदारांच्या मदतीने २१ वर्षीय तरुणीचे ऑटोतून अपहरण केले व तिच्याशी अश्लील चाळे केले. ही घटना नंदनवनमधील सीतला माता मंदिर परिसरात घडली.

नंदनवनमध्ये सतत होत असलेल्या विद्यार्थिनी व तरुणींच्या छेड काढण्याच्या घटनांनी पालकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी मोहम्मद आजम मोहम्मद आबिद (२३) याला अटक केली आहे. त्याच्या तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. २१ वर्षीय तरुणी व आजम हे दोघे दहावीपर्यंत सोबत शिकले. आजम हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. दहावीनंतर ही तरुणी नंदनवनमधील महाविद्यालयात शिकत होती. शुक्रवारी दुपारी ती महाविद्यालयात कॉलेज सोडल्याचा दाखला काढायला गेली. ते‌थून ती पायी परत घरी जात होती.

सीतला माता मंदिर परिसरात आजम व त्याचे तीन साथीदार ऑटोने आले. आजमने बळजबरीने‌ तिला ऑटोत बसविले व ‌तिच्याशी अश्लील चाळे केले. तरुणीने आरडाओरड केली. आजमने काही अंतरावर नेऊन तिला सोडले. तरुणी घरी गेली. नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. नातेवाइकांसह तरुणीने नंदनवन पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. डी. नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन. पी. मोहोड यांनी गुन्हा दाखल करून आजमला अटक केली.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *