Menu Close

देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदनाद्वारे मागणी

प्रत्येक वर्षी शासनाकडे अशी मागणी का करावी लागते ? चिनी फटाके प्रदूषणकारी आहेत आणि त्यांवर बंदी घालायला हवी, हे सरकारला का लक्षात येत नाही ?

सिंधुदुर्ग  : दीपावलीच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या प्रदूषणकारी फटाक्यांची अवैधरित्या विक्री होत असून या विक्रीला आळा घालावा. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होत असून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासह राष्ट्रीय अस्मितांवर आघात होत आहेत. त्यामुळे अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री सरकारने थांबवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.

मालवण येथे निवेदन स्वीकारतांना नगरसेवक दीपक पाटकर (१), त्यांच्या उजव्या बाजूला नगरसेवक मंदार केणी (२), नगरसेवक जगदीश गावकर (३) आणि अन्य

मालवण : येथील तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, नगरसेवक मंदार केणी, दीपक पाटकर, जगदीश गावकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री शिवाजी देसाई, मधुसूदन सारंग, रत्नाकर कोळंबकर, शिरीष नाईक, प्रकाश कदम आणि लक्ष्मण कुर्ले उपस्थित होते.

कणकवली येथे निवेदन स्वीकारतांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मजा चव्हाण

कणकवली : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मजा चव्हाण आणि तहसीलदार श्रीमती वैशाली माने यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नंदू आरोलकर, पाटणकर गुरुजी, दिगंबर पाटील, सचिन तेजसिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीधर मुसळे आणि सनातन संस्थेचे श्री. जयवंत सामंत आदी उपस्थित होते.

सावंतवाडी : येथील तहसीलदार सतीश कदम आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. सीताराम म्हापणकर, दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. शरद परब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत बिले, माजी मुख्याध्यापक श्री. अंकुश गवस, सनातन संस्थेचे श्री. शंकर निकम आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता वैभव चव्हाण उपस्थित होते.

देवगड : येथील नायब तहसीलदार गोविंद सावंत, पोलीस उपनिरीक्षक गोविंद वारंग यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर सनातन संस्थेचे सर्वश्री अनिरुद्ध दहिबावकर,  विजय पवार, अशोक करंगुटकर आणि सौ. शीतल पाटील आदी उपस्थित होते.

कुडाळ : येथील तहसीलदार अजय म. घोळवे आणि पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ आधुनिक वैद्य किरण हिरजे, आधुनिक वैद्य संजय सामंत, वैद्य सुविनय दामले, पप्पू गावडे, परशुराम वेंगुर्लेकर, नितीन सडवेलकर, अभिजित हडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंद नाईक, संतोष गावडे, संजय गावडे, वासुदेव तेंडोलकर आणि सौ. निलिमा सामंत आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *