Menu Close

सरकारने ‘सनबर्न’ला अनुमती दिल्यास राज्य टिकणार नाही ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

भोसरी (पुणे) येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात रणरागिणींचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात बोलतांना ह.भ.प. मंगलाताई कांबळे आणि उपस्थित कार्यकर्ते अन् रणरागिणी

भोसरी : ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध करत आहेत. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून राज्यात संस्कृतीद्रोह होणार असून सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारची अनुमती न देण्यासाठी दक्षता घ्यायला हवी. जर सरकारने ‘सनबर्न’ला अनुमती दिली, तर राज्य टिकणार नाही आणि संत-महंत येत्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवतील, असे सडेतोड प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाच्या धर्माचार्य ह.भ.प. मंगलाताई कांबळे यांनी केले. येथील पी.एम्.टी. चौकात १४ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. त्या वेळी उपस्थितांना संबोधित करत होत्या. आंदोलनामध्ये रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री कर्वे यांसह पंचक्रोशीतील समविचारी हिंदुत्वनिष्ठ महिला संघटनांच्या १०० हून अधिक महिला कार्यकर्त्या अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ भारतातून हद्दपार होईपर्यंत चालूच ठेवणार !  – कु. क्रांती पेटकर

राज्यामध्ये होऊ घातलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा अमली पदार्थांचा मुक्त वावर, व्यसनाधीनता आणि उच्छृंखलता यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. विकृत पार्श्‍वभूमी असलेला फेस्टिव्हल म्हणजे देशाचे बलस्थान असलेल्या युवा पिढीला अनैतिक आणि भ्रष्ट बनवण्याचे षड्यंत्रच आहे. संतांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र भूमीत युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘फेस्टिव्हल’ला प्रखर विरोध राहील. ‘सनबर्न’ला सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून नाही, तर भारतातूनच हद्दपार होईपर्यंत आमचा लढा चालू राहील.

राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – सौ. धनश्री कर्वे

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ‘फेसबूक’ खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विकृत विडंबन झाल्याचे आढळून आले आहे. २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्त प्रसारित (पोस्ट) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफीतीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. यापूर्वीही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तिरंग्याचा अयोग्य पद्धतीने वापर करून आचारसंहितेचा भंग केला होता. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचे पालन न करता स्वतःच्या लाभासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करून तिरंग्याला विकृत स्वरूपात प्रदर्शित करणे, हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजक आस्थापन ‘परसेप्ट लाईव्ह’ यांच्यावर शासन आणि पोलीस प्रशासन यांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा.

‘सनबर्न’ने लक्षात ठेवावे की, जळत्या सूर्याशी गाठ आहे ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

‘सनबर्न’चा अर्थ आहे की, जळता सूर्य. हिंदु धर्माप्रमाणे सूर्य तळपता आणि जळता असून ‘फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी लक्षात ठेवावे की, त्यांची गाठ जळत्या सूर्याशी आहे. त्यामुळे त्यांना रामकृष्णरूपी युवकांशी सामना करावा लागेल.

क्षणचित्र

आंदोलनाच्या प्रारंभीपासून एक घंटा सातत्याने पाऊस येत होता. भर पावसातही रणरागिणींनी आंदोलन चालूच ठेवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *