Menu Close

सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

  • सिंहगडाच्या संवर्धनामध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्याकडून धडक मोर्च्याची चेतावणी

पुणे : हिंदु जनजागृती समिती सिंहगडाच्या भ्रष्टाचाराविषयी आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहे; पण सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गडाच्या डागडुजीचे बांधकाम गडाच्या मूळ स्वरूपाला अनुसरूनच झाले पाहिजे. भविष्यकाळात यासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरू. आमच्या राजमाता जिजाऊ नवरात्रोत्सव मंडळाचा समितीच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. हरिश्‍चंद्र अण्णा दांगट पाटील यांनी केले. धायरीफाटा येथे १४ ऑक्टोबरला सिंहगडावरील भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते.

‘येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर धडक मोर्चा काढतील’, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आदित्य मांजरे, बजरंग दलाचे श्री. प्रसाद मते यांच्यासह ७० जण आंदोलनात सहभागी झाले होते.

गडकिल्ले शौर्यजागरणाची केंद्रे होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती समिती

सिंहगडाच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यास एवढा विलंब का होत आहे ? भ्रष्टाचाराच्या तुलनेत करण्यात आलेली कारवाई पुरेशी आहे का ? याची उत्तरे मिळायला हवीत. एकंदरीतच गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याच्या कार्यावर अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे सिंहगडाच्या देखभाल दुरुस्तीमध्ये झालेला हा भ्रष्टाचार हे हिमनगाचे टोक असू शकते. शीतावरून भाताची परीक्षा करायची म्हटले, तर अन्य गड-किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्यातही भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई तर करावीच, जोडीला गडप्रेमींसाठी तीर्थस्थाने असणारे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले शौर्यजागरणाची केंद्रे बनावीत, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा या मोहिमेचे समन्वयक श्री. प्रवीण नाईक यांनी केले.

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील ! – श्री. शंभू गवारे, सनातन संस्था

सर्व शिवप्रेमींचे आस्थेचे केंद्र असणार्‍या गडकोटांच्या संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार होणे लाजिरवाणे आहे. संघटित भ्रष्टाचार करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी. सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन नियमांनुसारच झाले पाहिजे. जोपर्यंत भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.

१५ दिवसांत दोषींवर गुन्हे न नोंदवल्यास आंदोलन तीव्र करू ! – पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी गडावर संपत्ती सापडली, तर मावळे प्रामाणिकपणे ती स्वराजाच्या कामासाठी शिवाजी महाराजांकडे सुपूर्त करत असत. सध्या मात्र गडाच्या संवर्धनाच्या कामाच्या रकमेत २५ टक्के फरक दिसत आहे. सरकारने या प्रकरणी १५ दिवसांत दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंदवावेत; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल. गडकिल्ल्यांचे खर्‍या अर्थाने जतन आणि संवर्धन करायचे असेल, तर हिंदु राष्ट्रच हवे !

क्षणचित्रे

१. अनेक जण आंदोलनस्थळी थांबून विषय समजून घेऊन पाठिंबा देत होते.
२. श्री. सुरेश पोकळे यांनीही आंदोलन पाहून उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

विशेष

‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ११ सहस्र ९०० जणांपर्यंत आंदोलनाचा विषय पोचला. ३ सहस्र ५०० जणांनी आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *