Menu Close

BJP कार्यालयावर बॉम्ब हल्ला, RSS च्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर केरळमध्ये तणाव

हिंदूनो, सर्व दिशांनी नाहक अत्याचार होत असतांना ते निमुटपणे सहन करणे हे महापाप आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कुठल्याही पक्षावर अवलंबून न राहता, स्वयंपूर्ण होऊन हिंदुराष्ट्राची स्थापना करा. – संपादक, हिंदुजागृती

कन्नूर : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील तालासेरी येथील भाजपच्या कार्यालयावर बुधवारी अज्ञात लोकांनी बॉम्ब हल्ला केला. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले अाहे. या हल्ल्यामागे माकपचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. हल्लेखोरांनी या हल्ल्यात गावठी बॉम्बचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. भाजपने घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.

दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील पप्पिनसेरीजवळ अरोली गावात माकपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माजी पदाधिकार्‍याची हत्या केली. पीव्ही सुजित असे या तरुणाचे नाव आहे. माकपचे हे कटकारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माकपच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री ११ च्या सुमारास माकप कार्यकर्त्यांनी पप्पिनसेरी मंडळातील माजी कार्यवाहक पी. व्ही. सुजित यांच्या घरावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सुजितसह कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यात त्याचे आई, वडील भाऊही जखमी झाले आहेत. सुजितच्या मानेला डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्यात त्यांचे पिता जनार्दनम, आई सुलोचना, भाऊ जयेश जखमी झाले असून त्यांच्या उपचार सुरु आहे.

भाजपने घटनेच्या निषेधार्थ कन्नूर, अझिकोड विधानसभा मतदारसंघात तसेच कन्नसपूरम, कल्लियासेरी पंचायत हद्दीत दिवसभर बंद पाळला आहे.

 संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *