-
डान्स बार आणि रेस्टॉरन्ट यांना देवतांची नावे देण्याला वीर सेनेचा तीव्र विरोध
-
उपाहारगृहाच्या मालकाने नाव पालटण्यासाठी मुदत मागितली
देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणारे वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांचा आदर्श समस्त हिंदूंनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : डान्स बार आणि उपाहारगृह यांना देवतांचे नाव देण्याच्या विरोधात वीर सेनेने तीव्र भूमिका घेतली आहे. अंधेरी (पूर्व) येथील ‘रामभवन’ हे डान्स बारचे नाव एका आठवड्याच्या आत न पालटल्यास वीर सेना हा डान्स बार बंद पाडेल, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी उपाहारगृहाच्या मालकाला दिली आहे. याविषयीचे पत्र वीर सेनेच्या वतीने उपाहारगृहाच्या मालकासह अंधेरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावे देण्यात आले आहे. वीर सेनेने दिलेल्या निवेदनानंतर या उपाहारगृहाच्या मालकाने कायदेशीररित्या उपाहारगृहाचे नाव पालटण्यासाठी १ मासाची मुदत मागितली आहे.
या पत्रात श्री. निरंजन पाल यांनी म्हटले आहे की, प्रभु श्रीराम समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्रीरामाच्या नावाने दगडही पाण्यावर तरंगले. प्रभु श्रीरामाच्या नावाने सर्व दु:ख दूर होते आणि तुम्ही तुमच्या डान्स बारचे नाव ‘रामभवन’ असे ठेवले आहे. डान्स बारला प्रभु श्रीरामाचे नाव देऊन तुम्ही समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
प्रभु श्रीरामाच्या नावाने असलेल्या या डान्स बारसह ठिकठिकाणी देवतांच्या नावाने चालू असलेले डान्स बार आणि उपाहारगृह यांची नावे पालटण्याचे आवाहन वीर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात