Menu Close

बेंगळुरू येथील बसस्थानकावर ५ धर्मांधांकडून चोरीच्या हेतूने सनातनच्या साधकावर चाकूने आक्रमण

२ भ्रमणभाष आणि पैशांचे पाकीट हिसकावून धर्मांध पसार

अशा घटनांवरून सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बेेंगळुरू (कर्नाटक) : येथील यशवंतपूर बसस्थानकावर ५ अज्ञात धर्मांधांनी सनातनचे साधक श्री. श्रीकांत चौधरी यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. ही घटना १५ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता घडली. धर्मांधांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. श्रीकांत चौधरी यांनी तो सतर्कतेने रोखला. या वेळी धर्मांधांनी श्री. चौधरी यांच्या जवळील २ भ्रमणभाष आणि पैशाचे पाकीट चोरून पळ काढला.

सविस्तर वृत्तांत असा की,

१. १५ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे साधक श्री. श्रीकांत चौधरी हे हासन येथून बसने निघाले होते. त्यावेळी बसमध्ये एक धर्मांध मुलगा त्यांच्या पाठीमागे उभा होता. काही वेळाने तो भ्रमणभाषवरून कोणाशी तरी आम्ही जवळ आलो आहोत, सिद्ध रहा, असे तो भ्रमणभाषवर बोलत असल्याचे श्री. चौधरी यांनी ऐकले होते.

२. त्यानंतर बस बेंगळुरूतील यशवंतपूर येथील बसस्थानकावर पोचल्यावर धर्मांध स्वत: न उतरता त्याने श्री. चौधरी यांना प्रथम उतरण्यास सांगितले. श्री. चौधरी बसस्थानकावर उतरून रस्ता ओलांडत असतांना एका धर्मांधाने समोरच्या बाजूने श्रीकांत यांचा गळा पकडून त्यांना मागे ढकलले. त्या वेळी मागून आलेल्या अन्य ४ धर्मांधांनी त्यांना पकडले आणि बळजोरी करत खिशातून २ भ्रमणभाष आणि पैशाचे पाकीट काढले.

३. गळा पकडणारा धर्मांध हा अन्य धर्मांधांना चाकू देण्याविषयी उर्दू भाषेतून सांगत होता. चाकू मिळाल्यावर त्याने श्री. चौधरी यांच्या पोटात चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्री. चौधरी यांनी सतर्कतेने त्यांच्या हातात असलेल्या खोका समोर धरल्यामुळे चाकू खोक्यात घुसला. या वेळी स्वतःला वाचवतांना श्री. चौधरी यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर धर्मांधांनी भ्रमणभाष आणि पैशांचे पाकीट घेऊन तेथून पळ काढला.

४. ही घटना २ ते ३ मिनिटांत घडली. त्या वेळी रस्त्यावर वाहनांची पुष्कळ गर्दी होती. आजूबाजूला साधारण ३० लोकही होते; मात्र आपापसात भांडत असतील, असे समजून लोकांनी याकडे दुर्लक्ष केले आणि कुणीही साहाय्यासाठी पुढे आले नाही. (असंवेदनशील हिंदू ! अशा स्थितीमुळेच हिंदूंवर वारंवार आक्रमणे होत आहेत. हिंदूंनो, उद्या हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे कठीण प्रसंगात धर्मबांधवांना संघटितपणे साहाय्य करण्यास शिका ! – संपादक)

५. यानंतर श्री. चौधरी यांनी आर्.एम्.सी. यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी श्री. चौधरी यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *