४५ लाख स्वयंसेवक असलेल्या रा.स्व. संघाने केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या वेळीच रोखल्या असत्या, तर हे लोण लुधियानासह अन्यत्र पसरलेच नसते ! संघ आता तरी केंद्र सरकारला हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई करण्यास भाग पाडेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लुधियाना – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रवींद्र गोसाई (वय ६० वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लुधियानामधील कैलाशनगर येथे ही घटना घडली. या आक्रमणात गोसाई यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र गोसाई हे संघाच्या शाखेतून परतत असतांना हे आक्रमण झाले. आक्रमणकर्ते दुचाकी वाहनावरून आले होते. आक्रमण केल्यानंतर ते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. देसाई यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात