फलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
फलटण : भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्या मुसलमानांची आवश्यकता आहे. त्यामुळे ते त्यांची बाजू घेत आहेत. येथील मुसलमान इतर मुसलमान राष्ट्रांहून भारतात अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळे रोहिंग्या मुसलमानांना भारताबाहेर काढायला हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलनाच्या माध्यमातून चांगले कार्य करत आहे, तरी सर्वांनी या कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे डॉ. विष्णु त्रिपुटे यांनी केले. येथे १४ ऑक्टोबर या दिवशी येथील गजानन चौक येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी ते बोलत हाते. या वेळी शिवसेनेचे श्री. विठ्ठल बिडवे उपस्थित होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी त्यांचे विचार मांडले.
भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकलून काढावे, हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणारे प्रा.के.एस्. भगवान यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच सिंहगड किल्याच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात