गोरक्षकांच्या कथित हिंसाचारावर बोलणारे, त्यांना समाजकंटक ठरवणारे गोतस्करांच्या हिंसेवर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगतात !
बेंगळूरु (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती. १७ ऑक्टोबरला या पथकाने यलहंक न्यू टाऊनजवळ असलेल्या दोड्ड बेट्टा या गावात अवैध पशूवधगृहाचे अन्वेषण करण्याचा प्रयत्न केला असता १०० हून अधिक धर्मांधांनी या अधिकार्यांवर आक्रमण केले, तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. न्यायालयाकडे मागणी करणार्या कविता जैन, जोश्ने अँटनी आणि न्यायालयाने नियुक्त केलेले अधिवक्ता प्रसन्न डी.पी. अन् हरिश एच्.पी. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी या पथकात होते.
या पथकाने यापूर्वी बकरी ईदनिमित्त शहरातील पशूवधगृहांची चौकशी करून ७३ गायींना वाचवले. याप्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. आतापर्यंत या पथकाने ८ अवैध पशूवधगृहे बंद करण्याचा आदेश दिला आहे. विद्यारण्यपूर येथे ४ ट्रकमधील २४ गायींना वाचवण्यात पथक अपयशी ठरले होते. केवळ हे ट्रक जप्त करण्यात आल्याने पोलीस गोतस्कारांना पाठीशी घालत आहेत का?, अशी शंका निर्माण झाली आहे.