हिंदुत्वनिष्ठांना असे आवाहन करावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! अशा संस्कृतीद्रोही कार्यक्रमांवर सरकार स्वत:हून बंदी का आणत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : राज्यामध्ये होऊ घातलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा अमली पदार्थांचा मुक्त वावर, व्यसनाधीनता आणि उच्छृंखलता यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. असा फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये येथील मोशी गावात आयोजित केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांनी प्रखर विरोध केल्याने त्या फेस्टिव्हलचे ठिकाण रहित केले आहे. असे असले, तरी हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘सनबर्न’ला देशाच्या बाहेर हाकलून देण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून विविध हिंदुत्वनिष्ठ ‘व्हॉट्स अॅप’ आणि ‘फेसबूक’ या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून संस्कृतीद्रोही ‘सनबर्न’च्या विरोधात प्रशासनाकडे रितसर तक्रार करण्यासाठी https://grievances.maharashtra.gov.in/mr या संकेतस्थळाला भेट देऊन ‘सनबर्न विरोधातील आपले मत नोंदवा’, असे आवाहन करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात