पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाके विक्रेत्यांना निवेदन
पुणे : देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फटाके विक्रेत्यांना निवेदन देण्यात आले. ते दिल्यावर अनेक फटाके विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा फटाक्यांची विक्री न करण्याविषयी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
फटाके विक्रेत्यांचा प्रतिसाद !
श्री लक्ष्मीची विटंबना होऊ नये, म्हणून देवीच्या चित्राचे फटाके न ठेवणारे श्री. विपुल पवार : श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेले फटाके फोडून हिंदूच हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. हिंदूंकडून धर्महानी होऊ नये, यासाठी मी या वर्षी देवतांची चित्रे असलेले कोणतेही फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. त्यामुळे फटाके विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट २ दिवसांत अर्ध्याहून अधिक फटाक्यांची विक्री झाली आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. मलाही या कार्यात सहभागी व्हायचे आहे. – श्री. विपुल रघुनाथ पवार, महारुद्र फटाका मार्ट, धायरीगाव.
देवतांची चित्रे पायाखाली येणे अयोग्य असल्याचे सांगणारे श्री. अक्षय रायकर : श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि देवतांची चित्रे असलेले फटाके वाजवणे आम्हालाही अयोग्य वाटते. देवतांची चित्रे योग्य ठिकाणी असणे महत्त्वाचे असून ती पायाखाली येणे, हे हिंदु धर्मासाठी चांगले नाही. केवळ प्रदर्शनासाठी आम्ही आमच्या कक्षावर ते फटाके ठेवले आहेत. – श्री. अक्षय रायकर, समस्त गावकरी फटाका मार्ट, नर्हेगाव. (धर्महानी रोखण्यासाठी देवतांची चित्र असलेले फटाके विक्री न करण्याची भूमिका घेणारे सर्वश्री विपुल पवार आणि अक्षय रायकर यांचे अभिनंदन ! असा आदर्श अन्यत्रच्या विक्रेत्यांनीही घ्यावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
फटाके विक्रेता संघाकडून चिनी मालावर बहिष्कार
या वर्षी भारतात चीन विरोधातील मतप्रवाह जोर धरू लागत असल्याने अनेक ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार टाकला जात आहे. सिंहगड रस्ता येथील फटाके विक्रेता संघानेही ‘या वेळी कोणतेही चिनी फटाके विकणार नाही’, असे घोषित केले आहे. (देशप्रेमी भूमिका घेणार्या फेटाके विक्रेता संघाचे अभिनंदन ! अशी भूमिका देशातील सर्व फेटाके विक्रेत्यांनी घ्यायला हवी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
यवतमाळ येथे पोलीस प्रशासनास निवेदन
वणी (यवतमाळ) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाक्यांवरील चित्रांमुळे हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा होणारा अवमान रोखण्यासाठी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले. अवैधरित्या बाजारात येणार्या चिनी फटाक्यांवरही प्रशासनाने बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात