ही आहे कारागृह प्रशासनाची अकार्यक्षमता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गुमला (झारखंड) : येथील कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता; मात्र एक आठवडा होऊनही या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात न आल्याने त्यांनी पत्र लिहून २४ घंट्यांत तो सादर करण्याचा आदेश चौकशी करणार्या पथकाला दिला आहे. या पथकामध्ये कारागृह अधीक्षक रॉबर्ट, एसडीओ के.के. राजहंस आणि एसडीपीओ भूपेंद्र प्रसाद राऊत यांचा समावेश आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
छोटू भुईया याची पत्नी मुस्लिम असल्याच्या कारणाने सासऱ्यांकडून धर्मांतरीत होण्यासाठी दबाव होत असे. त्याला कारागृहातून व खुनाच्या आरोपातून मुक्त होण्याचे प्रलोभन देखील दिले जात होते. बऱ्याच वेळा त्याला भेटायला कारागृहामध्ये येणा-या मौलवीने त्याचे धर्मांतरण केले. (भाजपच्या राज्यातील कारागृहातही हिंदूंचे धर्मांतर होणार असेल, तर हिंदूंनी कोणावर विश्वास ठेवायचा ? या सर्व घटनेची सखोल चौकशी करून सरकार उत्तरदायींना शिक्षा करील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात