- हिंदी-चिनी भाई भाई म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनवर कोण विश्वास ठेवणार !
- स्वतःच हुकूमशाही वृत्तीने वाद निर्माण करायचा आणि वर तो चर्चेने सोडवणार असे म्हणायचे, हा चीनचा धूर्तपणाच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शेजारी देशांशी असलेला वाद चर्चेद्वारे सोडवण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र देशाच्या सामरिक हितांच्या मूल्यावर असे केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे आश्वासन डोकलाम आणि दक्षिण चीनी समुद्र येथील वाद यांच्याशी जोडून पाहिले जात आहे. शी जिनपिंग चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते.
१. जिनपिंग पुढे म्हणाले की, चीन कधीही अधिपत्य किंवा विस्तारवादी असणार नाही. (चीनने यापूर्वी भारताचा सहस्रो चौ. किमी भूभाग गिळंकृत केला आहे, तिबेटला गिळंकृत केले आहे, ते तो स्वतंत्र करणार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मग त्याने विकासात कितीही प्रगती केली, तरी तो असे कधीही करणार नाही. चीन अन्य देशांच्या हितांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे चीनचा विकास अन्य देशांसाठी संकट बनणार नाही. कोणत्याही देशाला असा संशय येऊ नये की, चीन त्यांच्या हिताला बाधा आणणारे त्यांच्या देशांचे सर्व काही गिळंकृत करणार आहे. (विकासाच्या नावाखाली चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांना अब्जावधी रुपयांचे कर्ज देऊन त्यांना चीनचा गुलाम बनवत आहे, हे जगाच्या केव्हाच लक्षात आले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चीन शेजारी देशांशी सौहार्द, प्रामाणिकता, मित्रता यांना अधिक सशक्त करण्याच्या धोरणावर कार्य करणार आहे. (शी जिनपिंग यांच्या तोंडी हे शब्द म्हणजे कोल्ह्याची हुशारीच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. जिनपिंग यांनी त्यांच्या साडेतीन घंट्यांच्या भाषणात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला जागतिक स्तरावर प्रबळ बनवणार असल्याचे सांगितले.
३. आठवडाभर चालणार्या पक्षाच्या या बैठकीमध्ये राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या बैठकीत २ सहस्र ३०० जणांचा सहभाग आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात