न्यूयॉर्क : जर भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व हवे असेल, तर त्याने नकाराधिकाराची (‘व्हीटो’ची) मागणी सोडावी, असे प्रतिपादन अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत निक्की हॅली यांनी केले आहे. सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये पालट करण्यास रशिया आणि चीन यांचा विरोध आहे; मात्र अमेरिका यात पालट करण्यास सिद्ध आहे, असेही त्या म्हणाल्या. हॅली असे म्हणत असल्या तरी रशियाने भारताचा समावेश करण्याला समर्थन दिले आहे. तसेच ब्रिटन आणि फ्रान्स यांचेही समर्थन आहे. केवळ चीननेच आतापर्यंत यांस विरोध केला आहे. सध्या सुरक्षा परिषदेतील अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, आणि चीन यांच्याकडे नकाराधिकार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात