नंदुरबार : येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. ११ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या माध्यमातून ३ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचवण्यात आला. या वेळी सहस्रो विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करणार, असा संकल्प हात उंचावून केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि रणरागिणी शाखेच्या सौ. कल्याणी बंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिजामाता महाविद्यालय, विधी महाविद्यालय, यशवंत ज्युनियर महाविद्यालय, डीआर् ज्युनियर महाविद्यालय, श्रॉफ शाळा, अभिनव विद्यालय, एकलव्य विद्यालय, बीसीए महाविद्यालय, नवीन मराठी शाळा ज्युनियर महाविद्यालय, नूतन ज्युनियर महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय येथे प्रबोधनात्मक व्याख्यान देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम !
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती कृतीशील प्रयत्न करत असल्याने मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी नंदुरबार शहरात भेटकार्ड आणि भेटवस्तू यांच्या विक्रीत अन् संबंधित कार्यक्रमात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. (धर्मरक्षणासाठी कृतीशील असणार्या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात