Menu Close

आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढा ! – तहसील कार्यालयात निवेदन

निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रतिभा लेंडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कागल (जिल्हा कोल्हापूर) : भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये आणि आजवर भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, या मागणीसाठी नुकतेच कागल येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रतिभा लेंडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेे उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर श्रीमती प्रतिभा लेंडे यांनी अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकललेच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

विशेष

निवेदन देण्यापूर्वी तहसीलदार कार्यालयतील एक  कर्मचारी श्री. बाळासाहेब कागलकर यांनी हा विषय समजून घेतला आणि त्यांना तो आवडला. त्यानंतर ते स्वत: निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *