सोलापूर : देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांची विटंबना होते. तसेच चिनी फटाके विक्री आणि खरेदी करणे म्हणजे देशद्रोह असल्याने चिनी फटाक्यांची विक्री करू नये, तसेच विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे प्रबोधन करत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाकेविरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत धर्माभिमानी श्री. संदीप ढगे यांच्या पुढाकाराने संयुक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून येथील ६० फटाके विक्रेत्यांना निवेदन देण्यात आले. (संयुक्त प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन !- संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील पार्क चौक, होम मैदान, पूर्व भागातील पुंजाल मैदान येथील फटाके विक्रेत्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संयुक्त प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नागेश अचलकर, कार्यकर्ते सर्वश्री अक्षय अंजिखाने, राहुल हिबारे, संदीप ढगे, रोहन क्षीरसागर, आकाश श्रीराम, तेजस महिंद्रकर, विनायक धुपद यांसह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.
विशेष प्रतिसाद !
१. अनेक फटाके विक्रत्यांनी या मोहिमेला अगदी सकारात्मक प्रतिसाद दिला. काहींनी त्याच वेळी देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री न करण्यासाठी बाजूला काढले; तर काही विक्रेत्यांनी पुढील वर्षी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विकणार नाही, असे सांगितले.
२. काही ग्राहकांनी देखील विषय ऐकून घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात