एका राज्यातील एका जिल्ह्यात एका संघटनेच्या माध्यमातून शेकडो जणांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्याची बतावणी करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. मानवाच्या माकड हाडामध्ये कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत साडेतीन वेटोळे घालून बसलेली असून सहजयोगाद्वारे ती जागृत होते आणि नियमित ध्यानाद्वारे हा महायोग साध्य होत असल्याचे या संस्थेने त्याच्या विज्ञापनामध्ये म्हटले आहे.
(म्हणे) ‘आज्ञाचक्र’ ‘माता मेरी आणि येशू ख्रिस्त यांचे स्थान !’
वरवर हिंदु धर्मातील योगप्रणालीनुसार सहजयोग साधनेचे स्वरूप असल्याचे भासवत ही संस्था ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य करत आहे, हे त्यांनी या विज्ञापनामध्ये छापलेल्या छायाचित्रात सप्तचक्रांच्या स्थानांच्या माहितीवरून स्पष्ट दिसून येते. हिंदु धर्मात (कुंडलिनी योगसाधनेनुसार) आज्ञाचक्र हे सर्वश्रेष्ठ असे गुरूंचे स्थान आहे; पण या विज्ञापनामध्ये तेे स्थान ख्रिस्ती धर्मातील माता मेरी आणि येशू ख्रिस्त यांचे असल्याचे दर्शवले आहे. हा हिंदु धर्मावर केलेला आघात आहे. हिंदु धर्म मान्यतेनुसार सर्वश्रेष्ठ असलेले गुरुस्थान हे मेरी आणि येशू ख्रिस्त यांचे असल्याचे दाखवून त्यांना सर्वश्रेष्ठ ठरवण्याचे आणि हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे कारस्थान चालू आहे.
‘ॐ’ची विटंबना !
याच विज्ञापनाच्या मागील बाजूस हिंदु धर्मातील ‘ॐ’ हे चिन्ह दर्शवले आहे आणि इतर काही पंथातील चिन्हेही दर्शवली आहेत. या सर्व चिन्हांचा आधार ख्रिस्ती धर्मातील क्रॉस असल्याचे दर्शवले आहे. जिथे साईनाथांचे नाव छापले आहे, तिथे इस्लाम पंथातील चांद-तारा या चिन्हातील चांदच्या मध्ये ‘ॐ’ हे चिन्ह दर्शवून हिंदु धर्माची विटंबना केली आहे.
‘सहजयोग आजचा महायोग’ या नावाखाली विविध लाभांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र !
‘सहजयोग आजचा महायोग’ या मथळ्याखाली गावोगावी विनामूल्य कार्यक्रम आयोजित करून हिंदूंना तिथे उपस्थित रहाण्याचे आवाहन केले जाते. मनःशांती, समाधान, आनंद, व्यक्तिगत नातेसंबंध सुधारणा, आरोग्यात सुधारणा, शारीरिक अन् मानसिक आजारांवर नियंत्रण, कृषिक्षेत्रात प्रगती, व्यक्तीमत्त्व विकास इत्यादी लाभांचे आमीष दाखवून लोकांना आकर्षित केले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारे विज्ञापन करून कार्यक्रमांचे आयोजन होत असेल, त्या ठिकाणी त्यांचे सत्य स्वरूप पडताळून ते उघड करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
हिंदु धर्मातील योगक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन करत धर्मांतरासाठी पूरक असा धर्मप्रसार करण्याचे आणि पर्यायाने धर्मांतर करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात चालू असून हिंदूंनी त्याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे. समस्त हिंदूंनी सतर्क राहून त्याविरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात