Menu Close

हिंदु तरुणीचे बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्‍या २ धर्मांधांना अटक

अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी कोणी केल्यास चुकीचे ते काय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सहारनपूर (उत्तरप्रदेश) : येथील एका १९ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करून बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्‍या अश्रफ, वसीम आणि अन्य एक युवक यांना अटक करण्यात आली. त्यांनी या मुलीला १० दिवस डांबून ठेवले होते. तिला प्रयाग येथे विकण्यात येणार होते. ही मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. या विषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. पोलीस तिचा शोध घेत असतांना तिने घरी दूरभाष करून तिला डांबून ठेवण्यात आले असून तिला विकण्यात येणार आहे, असे कळवले. तसेच तिला ठेवण्यात आलेल्या जागेची माहिती दिली. यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि तिची सुटका केली. पोलीस पोहोचल्यावर तेथे रहाणार्‍या काही महिला पळून गेल्या.

पोलिसांनी सांगितले की, वसीमचा भाऊ मतलूब या मुलीच्या घरासमोर त्याच्या पत्नीसह रहात होता. त्याने या मुलीची अंघोळ करतांनाची छायाचित्रे चोरून काढली होती. ती छायाचित्रे दाखवून तो या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यानंतर अश्रफनेही तिच्यावर बलात्कार केला. एके दिवशी वसीमने तिला घरी बोलावून पळवून नेले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *