Menu Close

प्रसारमाध्यमे आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठपुराव्यानंतर धर्मांधाला पुन्हा अटक

  • कुर्ला (मुंबई) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केलेल्या आक्रमणाचे प्रकरण

  • पोलिसांकडून बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा प्रविष्ट

धर्मांधाला अटक होण्यासाठी पाठपुरावा घ्यावा लागणे हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदवाक्य असणार्‍या पोलिसांसाठी लज्जास्पद !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : नेहरूनगर, कुर्ला येथे १७ ऑक्टोबर या दिवशी धारदार शस्त्राने हिंदु युवतीवर आक्रमण करणार्‍या धर्मांध इम्रान शेख याच्यावर लावलेल्या सौम्य कलमांमुळे त्याला न्यायालयातून जामीन मिळाला; मात्र प्रसारमाध्यमे आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठपुराव्यामुळे धर्मांधाला पुन्हा अटक करण्यात आली, तसेच त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. (धर्मांधाला पाठीशी घालणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

शिवसेनेचे स्थानिक आमदार श्री. मंगेश कुडाळकर, बजरंग दल यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसावले. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिसांच्या कारवाईचा अहवाल मागितला. त्यानंतर २१ ऑक्टोबरला इम्रानला पुन्हा अटक करण्यात आली. (धर्मांधाला अटक करण्यास पोलिसांना भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक. दैनिक सनातन प्रभात)

वरील प्रकरणाची प्रसारमाध्यमांनीही नोंद घेऊन पोलिसांची असंवेदनशीलता आणि नाकर्तेपणाचे पितळ उघडे पाडले.

धर्मांधाला अटक केल्यानंतर कुर्ला परिसरात अज्ञात समाजकंटकांनी अनेक रिक्शांची तोडफोड केली. या घटनेचा निषेध म्हणून ही तोडफोड करण्यात आली असावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


मुंबईत धर्मांध युवकाने तरुणीची छेड काढत केले धारदार शस्त्राने वार

मुंबई : मुंबईतील कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठक्कर बाप्पा परिसरात धर्मांध युवकाने युवतीची भर रस्त्यात छेडछाड करत केस ओढून मारहाण केली. इतकेच नाही तर तिच्यावर धारदार शस्त्राने नाकावर वार केला आहे.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही सर्व घटना परिसरात असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुरक्षारक्षक आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली.

अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते. पोलिसांनी इम्रानवर कडक कारवाई करण्याऐवजी साधा गुन्हा दाखल करून अटक केली.

आरोपीला न्यायालयात उभे केले असता त्याला जामिनही मिळाला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकचे कलम लावण्यात आले. तर, याप्रकरणी पोलिस कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत.

संदर्भ : झी २४ तास


Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *