मुंबई : गडकोट-किल्ले यांचे संवर्धन व्हावे आणि युवकांमध्ये देव, देश अन् धर्म यांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या हेतूने विक्रोळी येथील श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त मातीच्या किल्ल्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रदर्शन भरवण्याचे हे ५ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीनिर्मित क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ठिकाणी मुलांसाठी किल्ल्यांचे चित्र काढण्याची स्पर्धा घेण्यात आली. यांतील उत्कृष्ट कलाकृती काढणार्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक
२१ ऑक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत संपूर्ण विभागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात