राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा वाढता विरोध
संभाजीनगर : पद्मावती या हिंदी चित्रपटाचे येथील आकाशवाणीसमोरील परिसरात आणि मोंढा नाका या भागात लावलेले मोठे फ्लेक्स फलक राष्ट्रीय राजपूत करणी सेना अन् राजपूत युवा मंच यांच्या कार्यकर्त्यांनी २१ ऑक्टोबरला फाडले. राजपूत राणी पद्मावती यांच्याविषयी चुकीचा आणि काल्पनिक इतिहास चित्रपटात रंगवला आहे. त्यामुळे राजपूत समाजासह समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप वरील दोन्ही संघटनांनी केला आहे.
१. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला भारतभर प्रदर्शित होणार आहे. इतिहासाचे विकृतीकरण असल्याच्या कारणावरून संभाजीनगर येथे पद्मावती चित्रपटाचे फ्लेक्स फलक फाडले !
२. राजपूत करणी सेनेचे महासचिव आणि मंचाचे संस्थापक अध्यक्ष देवीचंदसिंह बारवाल यांनी सांगितले की, आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, तसेच शहरात लावलेले चित्रपटाचे फलक काढण्यासाठी मुदतही दिली होती; पण ते न हटवल्याने कार्यकर्त्यांनी फाडले. हा चित्रपट दाखवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही चेतावणी त्यांनी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात