चीनची हुकुमशाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : कोणत्याही देशाने अथवा संघटनेने दलाई लामा यांचे आमंत्रण स्वीकार करणे हा आमच्या दृष्टीने चिनी नागरिकांच्या भावनांना दुखावण्याचा गंभीर अपराध असेल, अशी धमकी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष झांग यीजियोंग यांनी दिली आहे.
झांग पुढे म्हणाले की, चीन दुसर्या देशांनी आणि त्यांच्या नेत्यांनी दलाई लामा यांच्याशी धार्मिक नेत्याच्या नात्याने भेट घेणे स्वीकारणार नाही. कारण ते धार्मिकतेच्या नावाखाली वावरणारे राजकीय नेते आहेत.
झांग यांनी भारताचे नाव न घेता म्हटले की, वर्ष १९५९ मध्ये दलाई लामा मातृभूमीला धोका देऊन दुसर्या देशांत पळून गेले आणि विस्थापित म्हणून तेथे त्यांनी तथाकथित सरकार स्थापन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात