पाकव्याप्त काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्त्याची माहिती
पाकच्या विरोधात कोणी कितीही काही बोलले तरी त्याला काहीच फरक पडत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) : पाकचे सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी ठेवत आहे, अशी माहिती पाकव्याप्तमधील सामाजिक कार्यकर्ता तौकीर गिलानी यांनी दिली आहे. गिलानी यांनी म्हटले की, पाक सरकार आणि पाकचे सैन्य देश आणि काश्मीर यांच्या हिताचे काम करत नाही. जगात असा एकही देश नसेल, जो स्वतःच्या देशातील नागरिकांच्या विरोधातच काम करतो आणि त्यांच्यावर अत्याचार करतो. पाकचे सैन्य लोकांच्या विरोधात जिहाद्यांप्रमाणे वागते. तसेच नंतर या लोकांचा त्यांच्या सोयीने वापरही करून घेते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात