Menu Close

भारतीय मुसलमान तरुणांना इसिसमध्ये भरती करणार्‍या महिलेला फिलीपिन्समध्ये अटक

मनिला (फिलीपिन्स) : भारतातील मुसलमान तरुणांना इसिसमध्ये भरती करणार्‍या कारेन आयेशा हमिदन या भारतीय वंशाच्या महिलेला फिलीपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. तिच्याविषयी माहिती गोळा करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फिलीपिन्सशी संपर्क साधला आहे. हमिदन हिचा पती महंमद जफर माकिद हाही इसिसचा आतंकवादी होता; मात्र त्याला कारवाईमध्ये ठार करण्यात आले आहे. २०१६ पासून हमिदन हिला भारतीय अन्वेषण यंत्रणा शोधत होत्या. भारतासह अन्य ११ देशही तिचा शोध घेत होते. हमिदन सामाजिक माध्यमांतून, उदा. फेसबूक, टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांना हेरून त्यांना इसिसमध्ये भरती करून घेत होती. भारतात ती श्रीनगर, कानपूर, मुंबई, भाग्यनगर आदी शहरांतील आतंकवाद्यांच्या संपर्कात होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *