ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी फटाके फोडणाऱ्या आणि क्रिसमस ट्री तोडून निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या सर्व ख्रिस्ती विद्यार्थ्यांकडून ख्रिस्ती शाळांनी अशीच क्षमायाचना करून घ्यावी हीच अपेक्षा ! – संपादक, हिंदू जागृती
तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) : दिवाळीच्या दिवसांत फटाके फोडले म्हणून खिझापूदूर येथील एका शाळेने हिंदु विद्यार्थ्यांवर कारवाई केली. या प्रकरणी सदर विद्यार्थ्याचे वडील श्री. एस्. सेतूरामन् यांनी शाळेचे मुख्यध्यापक आणि शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक यांच्या विरोधात पलक्काराई पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी घटनेचे अन्वेषण चालू केले आहे.
दिवाळीच्या दिवसांत श्री. एस्. सेतूरामन् यांचा मुलगा, तसेच अन्य काही हिंदु विद्यार्थी यांनी फटाके फोडले. दिवाळीच्या दुसर्याच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या व्यवस्थापनाने प्रार्थनेच्या वेळेत संबंधित हिंदु विद्यार्थ्यांना मान वाकवून निसर्गाची क्षमा मागायला लावली. ज्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले नाहीत, त्यांना शबासकीपत्र देण्यात आले.
(म्हणे) ‘आम्ही तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे पालन केले !’ – शाळा व्यवस्थापन
ही घटना घडल्यानंतर पालक श्री. एस्. सेतुरामन् यांनी पोलिसांत तक्रार करून शाळेच्या या चुकीच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण आला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पोलिसांनी ती प्रविष्ट करून घेत शाळेचे मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक यांची २२ ऑक्टोबर या दिवशी चौकशी केली. यावर त्यांनी पोलिसांना ‘आम्ही तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे पालन केले’, असे सांगितले.
हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षकाने एका विद्यार्थिनीला ऊसाने मारले !
याच शाळेत आणखी एक संस्कृतीद्वेषी प्रकार उघड झाला आहे. शाळेतील एका विद्यार्थिनीने हातावर मेहंदी काढली म्हणून शारीरिक शिक्षक देणार्या शिक्षकाने तिला ऊसाने मारहाण केली. याप्रकरणी सदर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणीही पोलीस अन्वेषण करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात