Menu Close

पाटलीपुत्र येथे बलात्काराच्या प्रकरणी चर्चच्या पाद्र्याला अटक

अशा बातम्यांविषयी प्रसारमाध्यमे गप्प का ? याउलट एखाद्या हिंदु संतांवर असा आरोप झाला असता, तर त्याला लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली असती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पाटलीपुत्र : येथील २ महिलांनी चर्चचा पाद्री त्यांच्यावर गेल्या ३ महिन्यांपासून बलात्कार करत होता, असा आरोप केला होता. पोलिसांना हे आरोप खरे असल्याचे आढळल्यावर या पाद्र्याला अटक केली आहे. दुसरीकडे पाद्र्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर काही महिलांनी गोंधळ घालून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. चंद्रमा राज असे या पाद्र्याचे नाव असून तो दादर मंडी येथील इंडियन मिशन चर्चचा पाद्री आहे.

या महिलांनी सांगितले की, गेल्या ६ मासांपासून त्या चर्चशी निगडित होत्या. तिथे जाऊन प्रार्थना करत होत्या. पाद्री प्रार्थनेच्या वेळी गुप्तांगांना स्पर्श करत होता. ‘यामुळे तुमच्या शरीरातील सैतान पळून जाईल’ असे तो म्हणायचा. मागच्या २-३ महिन्यांपासून लैंगिक शोषण करण्यासोबतच तो अश्‍लील चाळे करायचा. मनाई केल्यावरही त्याने चाळे थांबवले नाहीत. एका पीडितेने आरोप केला की, जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा या पाद्रीने राजाबाजार येथील एका रुग्णालयामध्ये नेऊन तिचा गर्भपात केला.

(संदर्भ : ‘दिव्य मराठी’ संकेतस्थळ)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *