- गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता दर्शवणारी घटना !
- सरकार स्वतःही गोवंशियांचे रक्षण करत नाही आणि गोरक्षकांनाही करू देत नाही, त्यामुळे गोवंशियांची उघडपणे अवैध वाहतूक अन् त्यांची कत्तल होत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चांदूरबाजार/शिरजगाव कसबा (अमरावती) : शिरजगाव पोलिसांनी २१ ऑक्टोबरच्या रात्री गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओच्या) सहकार्याने कह्यात घेतला. यामध्ये ७५ गायी आणि बैल होते. २ दिवसांपूर्वीच शिरजगावात गोमांस विक्रीच्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.
१. शिरजगाव पोलीस ठाण्यापासून ९ किमी अंतरावर बहिरम येथे नवीन आरटीओ तपासणीनाका उभारला आहे. २१ ऑक्टोबरच्या रात्री जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशातून अमरावतीकडे येत होता; मात्र तपासणीनाका दिसताच चालकाने ट्रक थांबवला आणि तो सहकार्यांसह पळून गेला.
२. तेव्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचार्यांना ट्रकमध्ये गोवंश आढळले. त्यानंतर शिरजगाव पोलिसांनी ट्रक कह्यात घेतला. ट्रकमध्ये दोन माळे सिद्ध करून ७५ जनावरे अमानुषपणे कोंबण्यात आली होती. रासेगाव येथील गोशाळेत ही जनावरे पाठवण्यात आली आहेत. जनावरे आणि ट्रक असा एकूण १८ लाख २५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी शासनाधीन (जप्त) केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात