नंदुरबार येथे रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नंदुरबार : म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच भारताच्या विविध भागांत घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांना त्वरित हाकलून लावावे, अशी मागणी येथे २२ ऑक्टोबरला झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. आंदोलनात अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा’, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनात दिलीप ढाकणे पाटील, प्रा.डॉ. सतीष बागुल, डॉ. रजनी नटावदकर, पुष्पाबाई थोरात, प्रवीण थोरात, सौ. भारती पंडित, सौ. निवेदिता जोशी, जितेंद्र राजपूत, आकाश गावित, सुमित परदेशी आदींनी सहभाग घेतला.
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनीही म्यानमारमधील निर्वासित झालेल्या हिंदूंच्या सुरक्षेविषयी भारत देशाने धोरण घोषित करावे, तसेच हे सूत्र संयुक्त राष्ट्र संघात मांडावे आणि हिंसाचारी रोहिंग्यांची बाजू घेणार्या संघटना, संस्था, पक्ष आणि नेते यांना रोहिंग्यांसाठी आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये, अशा प्रमुख मागण्या केल्या.
नंदुरबारचे धर्माभिमानी श्री. राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘‘सिंहगडावरील बांधकामात झालेला भ्रष्टाचार हिंदू विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकारातून उघड केला आहे. भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना कठोर शासन करावे, तसेच संबंधितांकडून हा व्यय वसूल करावा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात