जालना : हिंदूंची सद्यस्थिती, हिंदूसंघटनाचे महत्त्व यांविषयी ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने येथील श्री संत आसारामबापू संप्रदायातील साधक परिवाराने गावात नुकतेच हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. गावातील प.पू. भडंगनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी असलेल्या मठात सभा घेण्यात आली. १०० हून अधिक महिला आणि पुरुष सभेला उपस्थित होते.
सभेत ‘हिंदूंमध्ये शौर्य जागरणाची आवश्यकता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीला रोखून हिंदु राष्ट्र स्थापन करणे का आवश्यक आहे’, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
दिवाळीच्या कालावधीत होणारी धर्महानी कशी रोखावी, याविषयी श्री. पवन देशमुख यांनी धर्मप्रेमींना उद्बोधित केले. सभेचे सूत्रसंचालन सौ. आरती शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
१. संप्रदायाच्या साधकांनी पुढाकार घेऊन सभेची सिद्धता केली.
२. जालना येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सभेच्या आयोजनात सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात