Menu Close

वाजिद अली शाह महोत्सवात फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे विडंबन ; राधेला अल्पवस्त्रात दाखवले !

मुसलमान व्यक्तीच्या नावे असलेल्या महोत्सवात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणे, हा समाजवादी पक्षाच्या शासनाचा कुटील डाव होय !
अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचे धाडस शासन दाखवणार का ?

उत्तरप्रदेश शासनाचा हिंदुद्रोह !

लक्ष्मणपुरी (लखनौ) : उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.

१. १४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या पर्यटन दिवसानिमित्त राज्यशासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे वाजिद अली शाह महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

२. या महोत्सवात राधा-कन्हैया का किस्सा या नावाने एक नाटक सादर करण्यात आले.

३. महोत्सवाच्या आधी या महोत्सवाच्या प्रसारासाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते.

४. या फलकांवर श्रीकृष्ण आणि राधा यांचे चित्र दाखवून त्यात राधा अल्पवस्त्रात दाखवण्यात आली होती. राधा-कृष्णाचे घोर विडंबन करणारे हेच चित्र महोत्सवाच्या व्यासपिठावरही लावण्यात आले होते. (यातून अखिलेश यादव शासनाचा हिंदुद्रोहच स्पष्ट होतो. हिंदु देवतांचे असे अश्‍लील विडंबन करणार्‍या उत्तरप्रदेश शासनाने अन्य पंथियांच्या धर्मश्रद्धांचे असे विडंबन केले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

५. या घटनेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार निषेध केला. हिंदु सेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी या विडंबनात्मक चित्राच्या विरोधात आंदोलन केले.

६. भाजपचे प्रदेश प्रवक्ता मनोज मिश्र यांनी या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *